esakal | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आल आहे. याची अधिकृत घोषणा उद्या (गुरुवार) होण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं.

दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून याबाबत सरकारवर वारंवार टीका होत होती. मात्र, आता अखेर सरकारनं यापदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा उद्या (गुरुवारी) होण्याची शक्यता आहे.

काल शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली होती. यामध्ये पक्षाचे मंत्री आणि खासदार यांचा समावेश होता. या बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांनतर चाकणकर यांच्या नावाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली.

loading image
go to top