

Rupali Chakankar: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील मृत युवती डॉक्टरचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला होता. महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही त्यांनी अशी विधानं करणं दुर्दैवी आहे, असं ठोंबरे यांचं म्हणणं होतं. उलटपक्षी त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटीस पाठवून प्रवक्ते पदावरुन पायउतार केलं.