ST संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल; तोडगा काढण्याचे हायकोर्टाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

msrtc strike

ST संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल: हायकोर्ट

मुंबई: एसटी संपावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होईल असं सांगितलं आहे. कोर्टाने संपावर तोडगा काढण्याचे आदेश समिती आणि संघटनेला दिले आहेत. या संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढण्यात यावा असं कोर्टाने सांगितलं आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा: ST संप: तोडग्याबाबत सकारात्मक चर्चा; अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट

दुसरीकडे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये परब यांची एसटी संपासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे या संपावर काय तोडगा काढता येईल, यासंदर्भात शरद पवारांशी आणि अधिकाऱ्यांशी तीन तास बैठक चालली.

अनिल परब म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासंदर्भातच शरद पवारांनी मला आणि अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली. या संपावर काय तोडगा निघू शकतो, याबाबत त्यांनी तपासणी केली. संप मिटवण्यासाठी महामंडळाची आर्थिक परिस्थिती आणि संपकरी कामगारांच्या मागण्या यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. सखोल चर्चा झाली आणि वेगवेगळे पर्याय कशापद्धतीने तयार करता येतील आणि मार्ग काढता येईल, यावर चर्चा झाली.

loading image
go to top