'थेन्स नगरी, चौपट दिल्ली' म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'थेन्स नगरी, चौपट दिल्ली' म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर हल्लाबोल

'थेन्स नगरी, चौपट दिल्ली' म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर हल्लाबोल

आजचा सामना वृत्तपत्राचा अग्रलेख विशेष आहे. ‘अथेन्स नगरी, चौपट दिल्ली’ या शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. पानभरून असलेल्या या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधला आहे. भावना गवळी यांनी रक्षाबंधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती. त्यावरही सामनाच्या या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

ईडी, फौजा, डागी नेते आणि करेक्ट कार्यक्रम! या सगळ्यावरच सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, परंतु संभ्रम असा आहे की, लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचार संपूर्ण मिटविण्याची गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईचे भय होते व त्या भयाने भूमिगत झालेल्या खासदार भावनाताईंचे रक्षाबंधन करून घेणारे मोदी खरे ? त्यामुळे कोणते मोदी खरे? यावर भाजपने तरी यावर प्रकाशझोत टाकावा”, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हंटलं आहे.

महाराष्ट्रातील खोकेबाज आमदारांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात आहे. खरे तर महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता व निकाल लागताच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दलबदलूंच्या राजकीय भ्रष्टाचारावर प्रहार करायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारण व समाजजीवनात स्वच्छ राजकारणी म्हणून, एक श्रेष्ठ पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा इतिहासात टिकावी असे वाटते, पण राजकीय विरोधकांवर केद्रीय तपास यंत्रणेचा झाडू आणि भावनाताई, यशवंत दादांच्या तोंडी शुद्ध तुपातला लाडू असा एकंदरीत करेक्ट कार्यक्रम सुरू आहे. बिहारचे सरकार घेरण्याची रणनीतीदेखील स्पष्ट दिसतेय असे मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.

Web Title: Saamana Editorial Attacking The Prime Minister From A Full Page Front Page Of Samana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modidelhi