esakal | #SaathChal आषाढीत प्रसादासाठी दहा लाख लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

पंढरपूर - भाविकांसाठी प्रसाद लाडवांचे पॅकिंग करताना कर्मचारी.

#SaathChal आषाढीत प्रसादासाठी दहा लाख लाडू

sakal_logo
By
राजकुमार घाडगे

रोज 40 हजार लाडू होतात तयार; 45 कर्मचारी तैनात
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी पंढरीला येणाऱ्या भाविकांसाठी यंदा 10 लाख प्रसाद लाडू बनविण्यात येणार आहेत. भक्त निवास पसिरातील कारखान्यात लाडू बनविण्याची लगबग सुरू आहे.

आषाढी यात्रेला सुमारे दहा लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्‍यता आहे. बहुसंख्य भाविक श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने प्रसाद म्हणून विक्रीसाठी बनवलेले बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसाद म्हणून आपल्या सोबत घेऊन जातात. त्यासाठी दरवर्षी मंदिर समितीकडून ठेकेदारामार्फत बुंदीचे लाडू व राजगिरा लाडू मोठ्या प्रमाणावर बनवण्यात येत असतात. यंदादेखील सुमारे 10 लाख बुंदी लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज 40 ते 45 हजार लाडू बनविण्यात येत आहेत. पाच आचारी बुंदी तयार करण्यासाठी, 20 महिला कर्मचारी लाडू बनविण्यासाठी, तर 20 महिला कर्मचारी लाडवांच्या पॅकिंगचे काम करीत आहेत. पॅकिंगसाठी आता प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक बटर पेपरचा वापर करण्यात येत आहे. बुंदीचे 2 लाडू 15 रुपयांना, तर राजगिऱ्याचे लाडू 10 रुपयांना विक्री करण्यात येत आहे.

loading image