Congress Slams BJP Over 'Kotak CSMT' and Other Corporate Metro Naming.
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Politics : भाजपचे हिंदुत्व कॉर्पोरेट : सचिन सावंत
Sachin Sawant : मुंबईतील मेट्रो स्थानकांना कॉर्पोरेट कंपन्यांची नावे जोडल्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या 'कॉर्पोरेट हिंदुत्वावर' टीका करत, हा अस्मितेचा व्यापार असल्याचा आरोप केला.
मुंबई : ‘‘भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व आता कॉर्पोरेट झाले आहे. भाजपने देव, आराध्य दैवत; तसेच ज्यांनी देशासाठी योगदान दिले त्यांचा अपमान केला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

