Sachin Sawant I 'भाजपाचा अजेंडा अन् मनसेचा राजकीय स्वार्थ पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Sawant vs Raj Thackeray

महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे?

'भाजपाचा अजेंडा अन् मनसेचा राजकीय स्वार्थ पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक'

राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा वाद शिगेला पोचला आहे. यासंदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असल्याने राजकीय वर्तुळातून मनसेवर टीका केली जात आहे. दरम्यान, आता सचिन सावंत यांनी एक मुद्दा उपस्थित करत मनसेला टोला लगावला आहे. मनसेचे अज्ञान किती? हे स्पष्ट दिसते, असे म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

हेही वाचा: 'रुस्तमजीचे महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याशी लागेबंध?'

यात ते म्हणतात, मनसेचे अज्ञान किती? हे स्पष्ट दिसते. मुंबई पोलिस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलिस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्‍याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले किंवा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजाने बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे, असे म्हणत त्यांनी कानउघाडणी केली आहे.

मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ २० मंदिराकडे परवानगी होती. तर ९२२ मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे, असे म्हणत त्यांनी मनसेवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील योगी सरकारचे कौतुक केले होते. त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी तात्काळ अमंलबजावणी केली आहे असे सांगत महाराष्ट्र सरकारला टोला लगावला होता.

हेही वाचा: संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Web Title: Sachin Sawant Criticize To Bjp And Raj Thackeray On Political Ego Creates Problems

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top