अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, वाझेनी ईडीला लिहिलं पत्र|Sachin Waze Letter To ED | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Waze Letter To ED

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, वाझेनी ईडीला लिहिलं पत्र

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) शंभर कोटी वसुलीच्या आरोपाखाली सध्या कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पण, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: वसुलीचे पैसे कोणाला दिले? चांदीवाल आयोगाला दिलेल्या अर्जात वाझेचा खुलासा

सचिन वाझेने शंभर कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्याने ईडीला पत्र लिहिले आहे. वाझे यासंदर्भात १४ फेब्रुवारीला न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधाच ईडीने दोषारोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर देशमुखांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर देखील १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रानुसार वाझे माफीचा साक्षीदार झाला तर देशमुखांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. आता न्यायालय त्यांना जामीन देणार की नाही? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

अनिल देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर कबुल केलं होतं. त्यानंतर मंगळवारी वाझेने जबाब बदलण्यासाठी अर्ज केला होता. मी देशमुखांच्या सांगण्यावरूनच वसुली केली आणि त्यांच्या लोकांना वसुलीचे पैसे दिले. माझ्यावर तुरुंगात असल्यापासून अत्याचार होत आहेत. मला वैद्यकीस सेवा देखील पुरवली जात नाही. देशमुख अत्यंत पॉवरफुल व्यक्ती असून त्यांच्यासह इतरांचा माझ्यावर दबाव आहे. पण, मी इतरांची नावे घेणार नाही. कारण, मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, असे खळबळजनक आरोप वाझेने अर्जात केले होते. मात्र, चांदीवाल आयोगाने वाझेचा अर्ज फेटाळून लावला.

Web Title: Sachin Waze Letter To Ed For Turn Approver Against Anil Deshmukh Money Laundering Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anil deshmukhsachin waze