Sadabhaou Khot : पवार आत्मचरित्रात करतात अदानींचं कौतुक; ओसाड गावचे पाटील म्हणत सदाभाऊंचा घणाघात

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यामागे अजित पवार हेच कारण असल्याचे म्हटले आहे.
Sadabhaou Khot
Sadabhaou KhotSakal

Sadabhaou Khot : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानींविरोधात देशात मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Sadabhaou Khot
Threat Call : मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवू; मध्यरात्री मुंबईच्या सहआयुक्तांना फोन

याप्रकरणात देशातील विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवरही टीका केली जात असतानाच आता, याप्रकरणात सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sadabhaou Khot
Chinchwad By Election: माझी विनंती आहे की....चिंचवड प्रचारसभेत अजित पवारांनी कलाटेंना दिला सल्ला

खोत म्हणाले की, पवारांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, पवारांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं करण्यात आले आहे.

पवार हे ओसाड गावचे पाटील असून, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात. तसेच बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं अशी बोचरी टीका खोत यांनी केली आहे. खोतांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sadabhaou Khot
Share Market : गुंतवणूकदारांना मोठा इशारा! देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांची अवस्था बिकट, गुंतवणूक...

संजय राऊत म्हणजे टाइम पास चॅनल

यावेळी पवारांवर टीका करण्याबरोबरच खोत यांनी खासदार संजय राऊत यांचाही खरपुस समाचार घेतला. संजय राऊत हे टाइम पास चॅनल असल्याचं ते म्हणाले.

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यामागे अजित पवार हेच कारण असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूचक विधान खोत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com