esakal | ''मुख्यमंत्री साहेब...बोलघेवडेपणा बंद करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करा''
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

''मुख्यमंत्री साहेब...बोलघेवडेपणा बंद करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करा''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने (maharashtra rain) धुमाकूळ घातला आहे. आधी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा तडाखा बसला. त्यामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालं. आता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील पावसाने हाहाकार माजविला आहे. यामध्ये मराठवाड्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याबाबत सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thacekray) यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: 'मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, केंद्राने मदत करावी'

महाराष्ट्रातला शेतकरी आज शेतामध्ये हंबरडा फोडत आहे. त्याच संपूर्ण शेत आता जलमय झालं आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांवर कधी अस्मानी, तर कधी सुलतानी, अशी एका मागोमाग संकट शेतकऱ्यांवर येत आहेत आणि राज्य सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, या पलिकडे काहीच बोलायला तयार नाही. महापुरातल्या आणि चक्रीवादळातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत होऊ शकली नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, पण राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आम्हाला केंद्र सरकारकडून काय मदत मिळणार आहे, याची कधी वाट पाहिली नाही, तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटामध्ये पॅकेज जाहीर करून मदत केली. सर्वात मोठी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. पण, आता या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत तुम्हाला आम्ही चिंतामुक्त करतो. शेतकरी सरणावर गेला तरी तुम्ही त्याला चिंतामुक्त करायला तयार नाही. महापुरातील व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. सरसकट पंचनामे करा, सरसकट विम्याचे पैसे द्या, सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज तातडीने माफ करा. बागायती शेतकऱ्यांना व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करावी. बोलघेवडेपणा आता बंद करा आणि राज्याची तिजोरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साठी उघडी करा आणि तत्काळ शेतकऱ्यांना खऱ्या अर्थांनी चिंतामुक्त करा, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

loading image
go to top