NCP : सदाभाऊ म्हणतात, जागतिक गणित तज्ञ म्हणून यंदाच 'नोबेल' मिटकरींना; राष्ट्रवादीकडून नाव जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau khot v/s amol mitkari

सदाभाऊ खोत यांनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

NCP : सदाभाऊ म्हणतात, जागतिक गणित तज्ञ म्हणून यंदाच 'नोबेल' मिटकरींना; राष्ट्रवादीकडून नाव जाहीर

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काही निर्णयांवर सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यातच शिवसेनेतील नेत्यांची गळती सुरु असली तर आदित्य ठाकरेंनी मात्र शिवसंवादच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा सुरु केला आहे. दरम्यान, या सगळ्यात आता भाजपा नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला डिवचलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात सदाभाऊ म्हणतात, जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी यांची नोबेल पारितोषिकसाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर झालं आहे, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

व्हिडिओत काय म्हणाले मिटकरी ?

विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. एका पक्षाची तीन मत फुटली. ती मत २१ कोटीसाठी फुटली. ३ मतांसाठी २१ कोटी तर २७ मत द्यावी लागतात, मग त्यासाठी १६१ कोटी, असा हिशेब करत त्यांनी १६१ कोटी रुपयांच्या मतांचे एक गणित मांडले आहे, त्यावरून सदाभाऊंनी हा टोला लगावला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती लावण्यात आली आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढला असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sadabhau Khot Criticized To Amol Mitkari On Mathematical Check Of Vote Counting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..