परिवहन मंत्री दिशाभूल करताहेत; सदाभाऊंचा अनिल परबांवर घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

कालपासून कोणताही चर्चेचा प्रस्ताव आंदोलनस्थळी आलेला नाही.

परिवहन मंत्री दिशाभूल करताहेत; सदाभाऊंचा अनिल परबांवर घणाघात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - एसटीच्या आंदोलना संदर्भात परिवहन मंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक झाली नसून ती बैठक एकत्र झाली होती. परिवहन मंत्री दिशाहीन करुन खोटं बोलत आहेत, असा आरोप शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमच्याशी चर्चा करण्याचा दर्जा त्यांना दिसत नाही, त्यामुळे 'सदाभाऊ आलाय म्हणून मी चर्चा करतो', असंही परिवहन मंत्री म्हणाले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा: विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

यावेळी ते म्हणाले, एसटी कर्मचारी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी राज्यसरकार पोलिसांना समोर आणून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांच निलंबनही केलं आहे. कालपासून कोणताही चर्चेचा प्रस्ताव आंदोलनस्थळी आलेला नाही. कॅश भरण्याचं कंत्राट बाहेरच्या व्यक्तीला ९ कोटी दिले जातात ? ते कशाला हवंय ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यसरकार एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण करणार आहे की नाही? विलीनीकरणाची आमची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुढे ते म्हणाले, एसटी महामंडळ तोट्यात कसं गेलं ? याच स्पष्टीकरण सरकारनं द्याव. वेतन कर्मचाऱ्यांना कस देता येईल, याचा तपशील आम्ही सरकारला देतो. राज्याचे माननीय परिवहन मंत्री दिशाहीन करून खोटं बोलत आहेत. त्यामुळे तातडीनं अनिल परब यांचा राजीनामा घ्यावा. नवीन परिवहन मंत्री येईल त्याच्याबरोबर आम्ही चर्चेला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवशाही बंद करा, ती खासगी मालकाची गाडी आहे. वाहन एसटीचा, डिझेल एसटीचं, प्रतिकिलोमिटर १८ रुपये द्यायचे, गाडी थांबून राहील तरी पैसे द्यायचे. या सगळ्यात मंत्री आणि आधिकाऱ्यांपर्यंत कोट्यवधी रुपयांचा मलिदा जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: 'हॉंगकॉंगमध्ये झोपा काढायला बसेस अन् महाराष्ट्रात...'

loading image
go to top