
ईव्हीएम समर्थनार्थ मारकडवाडीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची जाहीर सभा घेण्यात आली. मी दंडवत घालायला आलो आहे. इतिहास घडवला, याची दखल देशाने घेतली. आता इंडियातील मोठा चोर राहुल बाबा येणार आहेत. ते आधी जपान अमेरिकेला जायचे, पण त्यांना भारत नावाचा देश आहे हे माहिती नव्हते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच खळं लुटणारा गावाकडं आला असे नाव न घेता शरद पवार यांच्यावरही टीका केली.