
नवनाथ इधाटे, फुलंब्री: आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण अत्याधुनिक पद्धतीने अभ्यास करत यशाचे शिखर गाठतात. मात्र, घरची परिस्थिती हालाखीची आणि घरात अठरा विश्व दारिद्र अशी परिस्थिती असताना जिद्द आणि चिकाटी ठेवून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष मोबाईलचा त्याग केला. एवढेच नव्हे तर खाजगी अकॅडमीत सराव करायला पैसे नसल्याने तेथील साफसफाई करून सागर मैंद या तरुणाने छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस भरतीत पोलीस कॉन्स्टेबल पदावर यश मिळविले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.