Sai Baba Shirdi : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! संस्थानच्या समितीने घेतला मोठा निर्णय

sai sansthan
sai sansthanesakal

Sai Baba Shirdi : शिर्डी येथील साई मंदिरात जाताना भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थानच्या समितीने याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना फुले उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबवून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. 

कोरोना काळात घातलेली बंदी आता साई संस्थान उठवणार आहे. कोरोना काळात साईबाबाना  फुल, हार, प्रसाद वाहण्यास संस्थानने बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. 

शिर्डीच्या साई मंदिरात फुले व नैवेद्य नेण्यास बंदी घातल्याने तणाव वाढला होता. साईभक्त देखील नाराज होते. भाविक आणि दुकानदार सतत ही बंदी उठवण्याची मागणी करत होते. शिर्डीतील काही ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी बळजबरीने साईबाबा मंदिरात हार व फुले नेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संस्थेचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती. 

sai sansthan
Karnataka Election : मला फक्त आदर हवाय, सत्तेची भूक नाही; काँग्रेसमध्ये दाखल होताच शेट्टरांचा भाजपवर निशाणा

कोरोना काळात साई मंदिरातील हार, फुले आणि नैवेद्य यावर बंदी घालण्यात आली होती.  यामुळे दुकानदारांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. शेतात फुले सडत होती तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा देखी वाढत होता. शिर्डी भागात सुमारे ५०० शेतकरी फुलांची लागवड करतात. शिर्डीत दररोज लाखो रुपयांचा फुलांचा व्यवसाय होतो. 

sai sansthan
Ajit Pawar: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवारांचे पुण्यात बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com