Karnataka Election : मला फक्त आदर हवाय, सत्तेची भूक नाही; काँग्रेसमध्ये दाखल होताच शेट्टरांचा भाजपवर निशाणा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) तिकीट न मिळाल्यामुळं पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी पक्षत्याग केला.
Jagdish Shettar
Jagdish Shettaresakal
Summary

मला काँग्रेस पक्षाकडून इतका सन्मान मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं.

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) तिकीट न मिळाल्यामुळं पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी पक्षत्याग केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितलं की, 'आपला स्वाभिमान दुखावला गेला, त्यामुळंच मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला'.

अलीकडंच, शेट्टर (Jagdish Shettar) यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, यापूर्वी भाजपतर्फे हुबळी-धारवाड मतदारसंघातून अनेकांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा इथं पराभव झाला. मी पक्षाला इथं विजयी मिळवून दिलाय. 1994 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर सतत मी निवडणूक जिंकत आहे, त्यामुळंच लोकांचा माझ्यावरचा विश्वास वाढला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Jagdish Shettar
TMC Leader : 'मी पुरुष आहे, पण..'; समलिंगी विवाहाच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जींच्या पुतण्याचं मोठं वक्तव्य

'माझा स्वाभिमान दुखावला'

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट न देणं हा माझा अपमान आणि स्वाभिमान दुखावणारा असल्याचं जगदीश शेट्टर म्हणाले. मी त्यांना (भाजप) आव्हान देतोय. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या मूळ मतदारसंघातील हुबळी-धारवाड मतदारसंघात गेलोय. लोकांनी इथं माझं जोरदार स्वागत केलंय, असं त्यांनी सांगितलं.

Jagdish Shettar
VIDEO : तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या 'या' बड्या मंत्र्याला थेट मोदींचा फोन; नाराजी झाली दूर?

माजी मुख्यमंत्री शेट्टार म्हणाले, मला काँग्रेस पक्षाकडून इतका सन्मान मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतरांनी मला काँग्रेसकडून नेहमीच सन्मान मिळेल, असं आश्वासन दिलंय. मला फक्त आदर हवा आहे. मला सत्तेची भूक नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जगदीश शेट्टर हे 2023 ची कर्नाटक निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून लढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com