संत नामदेव महाराजांनी ‘येथे’ केले वास्तव्य

Saint Namdev Maharaj lived in Panjab for a few days
Saint Namdev Maharaj lived in Panjab for a few days

पुणे : वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक म्हणजे संत नामदेव! संत नामदेवांचे मूळ नाव नामदेव दामाशेठ शिंपी. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० ला झाला. विशेषतः पंजाबमधील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळत आहे. संत नामदेव महाराज फिरत फिरतच पंजाबमध्ये वास्तव्य केले. घुमान येथे नामदेवांचे मंदिरे आहे. मराठी प्रमाणेच नामदेवांनी हिंदीभाषेत देखील अभंगरचना केली. त्यावेळी ६५ पदांचा समावेश गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथात केले आहे.


महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज हे एक थोर संत होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. पंजाबमध्येही नामदेव महाराजांचे नाव आहे. नामदेव महाराज आपल्या आयुष्याची शेवटची २० वर्षे पंजाबमध्ये होते. शीख धर्मात संत नामदेवाना 'भगत नामदेव' म्हणून ओळखले जाते. आजही इतक्या वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत संत नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.


संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे म्हणाले, संत नामदेव महाराज १३ व्या शतकात पंजाबमध्ये गेले. तिथे अनेक वर्ष वास्त्यव्यास होते. त्यावेळी ६५ पदांचा समावेश गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथात केले आहे. संत नामदेव महारांजानी शीखधर्माला प्रेरणा दिली. घुमान येथे नामदेवांचे मंदिर आहे. संत नामदेवांना शीख लोक 'भगत नामदेव' म्हणून ओळखत होते. उत्तर भारतातील संत नामदेव पहिले संत होते. त्यांनतर होऊन गेलेल्या अनेक संतांनी संत नामदेव महाराजांचा उल्लेख केलेला आहे. संत नामदेव महाराज हे संपूर्ण भारत फिरले आहे. राष्ट्रीय ऐक्यासाठी संत नामदेव महाराजांच्या शिकवणीचे फार मोठे योगदान आहे.

संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये 'हे' स्वीकारलं...
संत नामदेव महाराज पंजाबमध्ये जवळपास २० वर्षं राहून पंजाबी भाषा शिकले. आपल्याला आजही पंजाबी भाषा सहजगत्या कळत नाही. नामदेवांनी ती त्या काळात आत्मसात केली. तिथेल हवमान, खाणं- पिणं, जगणं- वागणं सारं सारं त्यांनी स्वीकारलं. 

शीख लोक संत नामदेव महाराजांना अशी हाक मारत...
शीख लोक संत नामदेव महाराजांना 'भगत नामदेव' अशी हाक देतात, बाबा नामदेव किंवा नुसतंच बाबाजी... अशा नावांनी पंजाबी माणूस संत नामदेवांना हाक मारत.

पंजाबी मनातील त्यांचे स्थान...
शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणाऱ्या १५ भगवतांमध्ये नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखले जाते. गुरू अर्जुनदेवांनी तर ‘नामे नारायणे नाही भेद’ असे सांगत नामदेव आणि परमेश्वरामधील अंतरच संपवले. आज अनेक वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे.

गुरुद्वारा आणि मंदिर असा अनोखा संगम... 
संत नामदेवांच्या या मंदिरासमोर गुरुद्वारा आहे. हा बाबा नामदेवजी का गुरुद्वारा... म्हणजे नामदेवांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला गुरुद्वारा. येथे अनेक भागातील भक्त दर्शनास येतात. येथील जत्रेवेळी अनेक भक्त दर्शनास येतात. बाबा नामदेवजी का गुरुद्वारांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ‘बाबा नामदेवजी का गुरुद्वारा’ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर तसा बराच मोठा आहे. 

घुमान नावारुपाला आलं...
नामदेवांनी परस्परांशी गुंफलेली ही धाग्याची वीण सा-या घुमानमध्ये पाहता येते. खरं तर हे संपूर्ण गावच नामदेवांनी वसवलं, असे सांगतात. इथे आधी जंगल होतं. गावाजवळ असलेल्या भट्टिवाल या गावातून नामदेव या जंगलात येऊन वसले. त्यांच्या येण्यानंतर लोकांची वर्दळ वाढली. त्यांच्या भक्तांची वस्ती आसपास होऊ लागली आणि हे बघताबघता 'घुमान ' नावारुपाला आलं. काही असो, पण आज जसे पंढरपूर म्हणजे विठ्ठल तसेच घुमान म्हणजे बाबा नामदेव असे समीकरण बनले आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com