बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला रेषांचे बळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती.

पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती.

पुणे विभाग
पुण्यातील 300 केंद्रांवर सुमारे 500 पेक्षा जास्त शाळांचा सहभाग.
पालक, शिक्षक, मुख्याध्यापकांचा उत्साह वाखाणण्याजोगा.
गणपती बाप्पा, वाहतुकीचे दिवे, यंत्रमानवाला भेट, आवडते कार्टून, आइस्क्रीमचे दुकान विषयांमध्ये लोकप्रिय.
अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक रचनेतून साकारले चित्र.

औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये विद्यार्थ्यांकडून "सकाळ' नावाची मानवी साखळी.
उस्मानाबादमध्ये अपंग विद्यार्थ्याने पायाने काढले चित्र.
बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या परीक्षा केंद्रांना भेटी. जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक.
लातूरमध्येही लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची स्पर्धेला भेट.
जालना जिल्ह्यात खेडोपाडी प्रतिसाद, पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक.

नांदेड
भोकर येथील एक केद्रावर दिव्यांग मूलाने व्हिलचेअर्सचा आधार घेऊन परीक्षा दिली.
सिडको येथील शिवाजी विद्यालयात चित्रकला स्पर्धेतील सहभागी बालमित्रांना शुभेछा देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी भेट दिली.

हिंगोली
औंढा नागनाथ तालुक्‍यातील केळी येथील विद्यार्थी दोन किलोमीटर पायपीट करीत स्पर्धेत सहभागी.
गोरेगाव, हिंगोली केंद्रावर दिव्यांग विद्यार्थ्यांचाही उत्साह.

परभणी
थंडीचा कडाका असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साहात सहभाग.
जिल्ह्यातील अस्थिव्यंग, मूकबधीर शाळेतील विद्यार्थी झाले सहभागी.
सेलूत खासदार संजय जाधव यांनी दिली केंद्राला भेट.

खानदेशात उत्स्फूर्त सहभाग
जळगाव - खानदेशातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातून "सकाळ' चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडाक्‍याच्या थंडीतही चारही गटांतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेऊन कुंचल्यातून अनोखे कलाविष्कार साकारले.
सारंगखेड्याच्या यात्रोत्सवातील मुलेही सहभागी.
रावेर तालुक्‍यात सातपुड्यातील दुर्गम विद्यार्थ्यांचाही सहभाग.
नंदूरबार जिल्ह्यातून यंदा प्रथमच आश्रमशाळेतील हजार विद्यार्थी सहभागी.
स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे यांची विविध केंद्रांना भेट.

सातारा विभाग
सातारा जिल्ह्याच्या 20 केंद्रांवर स्पर्धा.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनीही रंगरेषांच्या दुनियेत घेतली भरारी.
सुटीदिवशी स्पर्धा असतानाही पाल्यांसमवेत पालकांचा उदंड प्रतिसाद.
पाचगणीच्या न्यू ईरा हायस्कूलच्या प्रांगणात "तारे जमीं पर' चित्रपटातील दृश्‍यांना उजाळा.
सातारा जिल्ह्यातील विशेष मुलांच्या शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.

सोलापूर विभाग
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 130 केंद्रांवर परीक्षा.
सकाळी 8 पासूनच विद्यार्थ्यांची गर्दी.
तालुक्‍याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग.
बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून साकारलेले "सकाळ' नाव.
कार्टून, पाळीव प्राणी, शाळेतील फन फेअर, शेतकरी कागदावर उतरले.

नाशिक
जिल्ह्यात 50 केंद्र व 215 शाळांमध्ये बैठक व्यवस्था, 42 आश्रमशाळांचा सहभाग.
झोडगे (ता. मालेगाव) केंद्रावर वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत अन्‌ तनिष्का भगिनींनी स्पर्धा फलकाचे केले पूजन.
येवला येथील एस. एन. डी. इंग्लीश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून साकारले "सकाळ' नाव.
ग्रामीण-आदिवासी विद्यार्थ्यांचा उत्त्स्फूर्त प्रतिसाद.
केंद्रावर श्री निलमनी गणेश मंदिर विश्‍वस्तांतर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शिक्षण विभागाचे अधिकारी, नगरसेवक, शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा वाढवला उत्साह.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडला प्रतिसाद.
ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये सलग दोन-तीन वर्षे स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थीही त्याच उत्साहाने पुन्हा सहभागी झालेले पाहायला मिळाले. पनवेल-उरणमधील 12 शाळांमध्ये स्पर्धेला उदंड प्रतिसाद.
नवी मुंबईत आठ केंद्रांवर ही स्पर्धा झाली.
रायगड जिल्ह्यातील 16 केंद्रांवर गर्दी.
पालघरमध्येही मुलांचा उत्साह दांडगा होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Drawing Competition