Sakal Drawing Competition : ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ २१ जानेवारीला

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ यंदा २१ जानेवारीला होणार आहे.
Sakal Drawing Competition 2024
Sakal Drawing Competition 2024sakal

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ यंदा २१ जानेवारीला होणार आहे. एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्र व गोव्यात होणारी सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती आहे. १९८५ पासून गेली ३८ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून, यंदाचे ३९ वे वर्ष आहे. कोरोना काळातसुद्धा ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात झाली होती.

आतापर्यंत कोट्यवधी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरुवात झाली. दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत व त्यांचा सहभाग दरवर्षी वाढत जाणारा आहे.

स्पर्धेचे स्वरूप

ही ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धक ५० रुपये शुल्क आहे. स्पर्धा एकूण सहा गटांत होणार असून, शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) त्यांनी निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.

लिंक : chitrakala.sakalnie.in, www.ticketkhidakee.com

QR Code
QR CodeSakal

असे आहेत नियम

- स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही.

- कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमांचे बंधन नाही.

- चित्र कोणत्याही रंग साहित्याने रंगवू शकता.

- स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे दिला जाईल.

- स्पर्धेचे नियम, ऑफलाइन स्पर्धा केंद्रांचे तपशील, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेबाबतची माहिती ‘सकाळ’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे गट व वेळ (प्रत्यक्ष स्पर्धा)

‘अ’गट-पहिली व दुसरी

‘ब’गट-तिसरी व चौथी

वेळ - सकाळी ११ ते १२.३०

‘क’ गट-पाचवी ते सातवी

‘ड’गट-आठवी ते दहावी

वेळ - सकाळी ९ ते १०

ऑनलाइन स्पर्धा

  • ‘इ’गट- सर्व प्रकारच्या विद्याशाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी

  • ‘फ’गट-पालक व जेष्ठ नागरिक

  • वेळ - स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत चित्र अपलोड करता येईल.

येथे करा संपर्क

राज्यभरातील प्रमुख शहरांतील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रम शाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरातील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी 9881598815 या क्रमांकावर व rahul.garad@esakal.com या ईमेलवर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com