esakal | कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!
sakal

बोलून बातमी शोधा

Barack_Obama

कोरोनाच्या भीतीमुळे जगभरात अचानक मास्कची मागणी कैक पटींनी वाढली. काल जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या संरक्षण साहित्याचा तुटवडा भासत असल्याचे म्हटले होते.

कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : सध्या जगभरात कोरोनाचीच चर्चा सुरू आहे. चीनपासून सुरवात केलेल्या या व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या तावडीतून महासत्ता असलेला अमेरिका हा देशही सुटू शकला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लोकांना एक हटके आवाहन केले आहे. ओबामांनी नागरिकांना मास्क वापरू नका असे आवाहन केल्याने यामुळे अमेरिकी नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. 

- इटलीमध्ये कोरोनाचे 100 हून अधिक बळी; शाळा, महाविद्यालये बंद

कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी मास्क वापरण्याचा प्राथमिक सल्ला डॉक्टरांनी दिला असताना ओबामांच्या या वक्तव्यामुळे नागरिक चक्रावले आहेत. आतापर्यंत १५० अमेरिकी नागरिकांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळे ओबामांनी नागरिकांना खबरदारी घेण्याची विनंती केली आहे. 

ओबामांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी मास्क वापरण्याची काही आवश्यकता नाही. ठराविक वेळेनंतर आपले हात स्वच्छ धुवावेत. तसेच घरीच आराम करावा आणि आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.'' 

- आता अवघड! माणसांनंतर आता प्राणीही सापडले कोरोनाच्या विळख्यात

ते पुढे म्हणाले की, ''मास्क हे हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगोदर मिळणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवांकडे लक्ष्य देऊ नका. त्या गोष्टीमागील विज्ञान समजून घ्या.''

- कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आलंय 'या' गोष्टीचं टेन्शन!

कोरोनाच्या भीतीमुळे जगभरात अचानक मास्कची मागणी कैक पटींनी वाढली. काल जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या संरक्षण साहित्याचा तुटवडा भासत असल्याचे म्हटले होते. अमेरिकेतही सध्या मास्क आणि इतर सुरक्षा साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ओबामांचे जगभरात कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या या आवाहनामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना, कोरोनाबाबतची भीती कमी झाल्याची चर्चा होत आहे.

loading image