सकाळ चित्रकला स्पर्धा आज रंगणार

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 12 जानेवारी 2020

स्पर्धेला जाताना...

  • चित्र काढण्यासाठी स्पर्धक काळी किंवा रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स (रंगीत खडू), पोस्टर कलर्स, ॲक्रॅलिक कलर्स, स्केच पेन्स आदी माध्यमांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करू शकतात. 
  • चित्राची मांडणी, लय, हावभाव, प्रमाणबद्धता याकडे लक्ष द्या.
  • चित्र दिलेल्या वेळेत पूर्ण करा. 
  • तुमचे चित्र कोणत्याही चित्राची प्रतिकृती असू नये. ती तुमची स्वतःची अभिव्यक्ती असावी.
  • चित्र काढताना नवनवीन पद्धतींचा वापर करून चित्रकलेतला आनंद घ्या. आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा. 
  • स्पर्धेत भाग घेऊन मज्जा करा, आनंद लुटा. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

पुणे - रंग, रेषा, छटांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ उद्या रविवारी (ता. १२) सकाळी महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच वेळी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सकाळ’मध्ये दि. ३, ५, ७ आणि ९ तारखेला प्रकाशित झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येईल. आदिवासी आश्रमशाळा आणि विशेष मुलांनी कोणतेही कूपन अथवा प्रवेश शुल्क भरण्याची आवश्‍यकता नाही. पूर्ण भरलेले विशेष कूपन आणि प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. मात्र स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. 

स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

चार गटांत स्पर्धा
महाराष्ट्र, गोव्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा
    ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी
    ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी
    ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी
    ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी
    वेळ - ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०
    ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.३०

असे व्हा सहभागी
  घराजवळील स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन घेऊन स्पर्धेत सहभागी व्हा. भरलेले कूपन पुन्हा एकदा तपासा
  विशेष कूपन भरू न शकल्यास http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा किंवा 
  मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal drawing competition today