पाच राज्य व २०२३ मध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटासाठी मिळाले आहेत. ११० चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शितही झाला; पण अपेक्षित उत्पन्न काही पदरात पडले नाही.
Tendlya Marathi Movie : एखादा चित्रपट बनविणे एकवेळ सोपे आहे; परंतु प्रदर्शित करणे अवघड आहे, हे मराठी चित्रपटक्षेत्रातील दुखणे कायम आहे. मराठी चित्रपटाला (Marathi Movies) चित्रपटगृहे मिळण्यासाठी जंगजंग पछाडावे लागते. त्यानंतर चित्रपटगृह मिळाले तर तो किमान एक आठवडा तरी टिकविण्याचे आव्हान कायम असते. ‘तेंडल्या’च्या निमित्ताने पुन्हा एकदा हे प्रश्न समोर आले आहेत.