‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान सोहळा आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Idols of Maharashtra

`सकाळ माध्यम समूह` नेहमीच समाजातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो.

Sakal Event : ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ सन्मान सोहळा आज

नागपूर - आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘शिक्षण’ आणि ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राच्या विकासात योगदान देत उत्तुंग भरारी घेतलेल्या दिग्गजांचा शनिवारी (ता.२४) `सकाळ ऑयडॉल्स ऑफ महाराष्ट्र` पुरस्काराने शानदार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे उपस्थित राहतील. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कार्य करीत आपली राज्यभर ओळख निर्माण केलेल्या दिग्गजांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

`सकाळ माध्यम समूह` नेहमीच समाजातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. शहर व ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या मान्यवरांसह बांधकामाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत हजारो लोकांचे घरकुलाचे स्वप्न साकारणाऱ्या व शहर तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मानार्थी म्हणून समावेश करण्यात आला आहे. आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे कौतुक केल्यास त्यांना नवी ऊर्जा मिळते व त्यांच्या कार्यापासूनच समाजातील इतर घटकांनाही नवीन प्रेरणा मिळते. अशांच्या कार्याची दखल `सकाळ` नेहमीच घेत आला आहे. त्यांचे शहर, गाव, समाजासाठी अमूल्य योगदान आणि त्यांच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव करण्यासाठी `सकाळ`ने पुढाकार घेतला आहे.

स्थळ - हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ

दिनांक - शनिवार, २४ डिसेंबर २०२२

वेळ - दुपारी ११.०० वाजता

निमंत्रितांनाच प्रवेश

टॅग्स :maharashtraSakalEvent