esakal | सहकार मंत्री अमित शहांवर शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास | Sharad Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार मंत्री अमित शहांवर शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

सहकार मंत्री अमित शहांवर शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण करून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे सोपवले. यानंतर अमित शहांबाबत राजकीय विरोधकांकडून संशय व्यक्त करण्यात आला. पुण्यात सकाळ महा कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मात्र अमित शहांबाबत विश्वास व्यक्त केला आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सहकार खाते अमित शहांकडे आहे. माझा आणि अमित शहा यांचा संपर्क ते सहकारी बॅंकेचे संचालक असताना आला होता. अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या माणसाचा दृष्टीकोन चांगलाच असेल असं मला वाटतंच.

हेही वाचा: सर्व अधिकार RBI कडे गेल्यास संचालकांनी काय करायचं - शरद पवार

अमित शाह यांच्याशी माझी चर्चा झाली. सहकारी चळवळीसाठी त्यांचे योगदान चांगलं राहील, असं मला वाटतं. अमित शहा यांचं सहकारी बँका संदर्भात धोरण अनुकूल राहील असं मला वाटतं ते अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक होते आमच्यासारखे लोक अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे सहकाऱ्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात ६७% गैरव्यवहार सांगितलं गेलं. पण ती रक्कम कमी आहे. याबाबतची माहिती अधिकारात माहिती काढली असल्याचंही पवार म्हणाले.

loading image
go to top