
सकाळ मिडिया ग्रुपने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आघाडीच्या प्रसारमाध्यम समूहाच्या रूपात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. Comscore अहवालानुसार जानेवारी 2025 मध्ये ई-सकाळ (esakal.com) हा सर्वाधिक वाचला जाणारा मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. तब्बल 13.05 मिलियन मासिक अॅक्टिव्ह युजर्स असलेल्या ई-सकाळने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
सकाळ मिडिया ग्रुपच्या यशामागे ई-सकाळ या प्लॅटफॉर्मचा मोठा वाटा आहे. पारंपरिक पत्रकारिता आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारा हा प्लॅटफॉर्म आज महाराष्ट्रातील वाचकांच्या हृदयात स्थान मिळवून आहे.
Comscore च्या अहवालात ई-सकाळने मिळवलेली 13.05 मिलियन मासिक अॅक्टिव्ह युजर्स ही संख्या या प्लॅटफॉर्मवरील प्रचंड लोकप्रियतेची आणि विश्वासार्हतेची साक्ष देते. हे यश फक्त सकाळ मिडिया ग्रुपसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेसाठीही एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.