
मुंबई : ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने वरळी येथील ‘एनएससीआय डोम’ येथे दोन दिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त स्थापन करण्यात येणाऱ्या ‘भक्ती शक्ती व्यासपीठा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘जीवन विद्या मिशन’चे प्रल्हाददादा वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. ८) सकाळी ९.३० वाजता होणार आहे.