Sakal Premier Awards: सकाळ प्रीमियर पुरस्कारांसाठी विविध चित्रपटांमध्ये चुरस

धर्मवीर, वाळवी, मी वसंतराव, सरसेनापती हंबीरराव, गोष्ट एका पैठणीची, चंद्रमुखी स्पर्धेत
Sakal Premier Award
Sakal Premier AwardSakal Digital

Sakal Premier Award 2023

मुंबई : अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्याची नामांकने अखेर जाहीर झाली आहेत. वाळवी, मी वसंतराव, चंद्रमुखी, गोष्ट एका पैठणीची, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटांमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी चुरस लागली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अजय पुरकर आणि ललित प्रभाकर या अभिनेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी, तर सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, मुक्ता बर्वे, जिनिलिया देशमुख आणि पूर्वा पवार या अभिनेत्रींमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी स्पर्धा रंगली आहे. येत्या १२ एप्रिल रोजी हा अंतिम सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

सकाळ प्रीमियर सोहळ्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. मनोरंजन तसेच सामाजिक आणि राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. खुसखुशीत आणि चमचमीत विनोद तसेच नृत्याचा आविष्कार अशी मनोरंजनाची खास मेजवानी आहे. या सोहळ्याची प्रसिद्धी भव्य स्तरावर करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ४६ चित्रपटांनी सहभाग घेतला आहे.

पुरस्कार सोहळ्याबाबत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की सकाळ प्रीमियर पुरस्कार आणि आमचे नाते फार जुने आहे. आम्ही दरवेळीच हा पुरस्कार सोहळा भव्य-दिव्य केला आहे आणि यावेळीदेखील नक्कीच करू. पहिला पुरस्कार सोहळा आम्ही मुंबईत केला होता. त्यानंतर पुण्यात केला आणि या वर्षीचा सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा आम्ही ठाण्यामध्ये करत आहोत. त्यामुळे ठाणेकर या पुरस्कार सोहळ्याला गर्दी करतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळेच मी या सोहळ्यासाठी खूप उत्सुक आहे.

पुरस्कार जाहीर

प्रीमियर सर्वोत्कृष्ट बालकलाकार

१. आर्यन मेघजी (बालभारती)

२. खुशी हजारे (वेड)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पदार्पण चेहरा

  • अभिनेत्री ऊर्मिला जगताप (रौद्र)

    प्रीमियर सर्वोत्कृष्ट खलनायक

  • पुष्कर जोग (व्हिक्टोरिया)

प्रीमियर ज्युरी स्पेशल पुरस्कार

१. सर्वोत्कृष्ट चित्रपट - वाय, शिवप्रताप गरुडझेप

२. सर्वोत्कृष्ट अभिनेता - श्रेयस तळपदे (आपडी थापडी)

३. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - हृता दुर्गुळे (अनन्या)

विशेष पुरस्कार

सकाळ प्रीमियर अल्ट्रा झकास पुरस्कार - सई ताम्हणकर

नामांकन यादी (Marathi Entertainment Awards Nominations)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट चित्रपट :

वाळवी (झी स्टुडिओज/ मयसभा करमणूक मंडळी), धर्मवीर (साहिल मोशन आर्ट/ झी स्टुडिओज), मी वसंतराव (अंतर्नाद एंटरटेन्मेंट), गोष्ट एका पैठणीची (प्लॅनेट मराठी), बालभारती (स्फीयर ओरिजिन्स मल्टिव्हिजन प्रा. लि.)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रवीण तरडे (धर्मवीर), परेश मोकाशी (वाळवी), शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची), निपुण धर्माधिकारी (मी वसंतराव), अजित वाडीकर (वाय)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट अभिनेता : प्रसाद ओक (धर्मवीर), जितेंद्र जोशी (गोदावरी), स्वप्नील जोशी (वाळवी), अजय पुरकर (पावनखिंड), प्रवीण तरडे (सरसेनापती हंबीरराव), ललित प्रभाकर (सनी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मुक्ता बर्वे (वाय), सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची), पूर्वा पवार (३६ गुण), सई ताम्हणकर (पाँडिचेरी), जिनिलिया देशमुख (वेड), अमृता खानविलकर (चंद्रमुखी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : क्षितिज दाते (धर्मवीर), नंदू माधव (वाय), शुभंकर तावडे (वेड), सुबोध भावे (वाळवी), सिद्धार्थ जाधव (बालभारती), रमेश वाणी (बोल हरी बोल)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनिता दाते (मी वसंतराव), मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी), क्षिती जोग (सनी), पर्ण पेठे (मीडियम स्पायसी), प्रेमा साखरदांडे (फनरल), शिवानी सुर्वे (वाळवी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट कथा : मधुगंधा कुलकर्णी/ परेश मोकाशी (वाळवी), रमेश दिघे (फनरल), शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची), अजित वाडीकर (वाय), तेजस मोडक/ सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पटकथा : मधुगंधा कुलकर्णी/ परेश मोकाशी (वाळवी), अजित वाडीकर/ स्वप्नील सोज्वळ (वाय), रमेश दिघे (फनरल), निपुण धर्माधिकारी/ उपेंद्र सिधये (मी वसंतराव), तृशांत वंगळे (झॉलिवूड)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संवाद : प्रवीण तरडे (धर्मवीर), प्रवीण तरडे (सरसेनापती हंबीरराव), निपुण धर्माधिकारी/ उपेंद्र सिधये (मी वसंतराव), मधुगंधा कुलकर्णी/ परेश मोकाशी (वाळवी), इरावती कर्णिक (मीडियम स्पायसी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट गीतकार : हंबीर तू... (प्रणीत कुलकर्णी - सरसेनापती हंबीरराव), बाई गं... (अजय-अतुल/ गुरू ठाकूर - चंद्रमुखी), जगू आनंदे... (अक्षय शिंदे - फनरल), सुख कळले... (अजय-अतुल - वेड), रे मना घे विचारून... (वैभव जोशी - सहेला रे)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संगीतकार : राहुल देशपांडे (मी वसंतराव), अजय-अतुल (चंद्रमुखी), अजय-अतुल (वेड), सलील कुलकर्णी (सहेला रे), विजय गावंडे (सोयरीक)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : अविनाश - विश्वजीत (धर्मवीर), अविनाश-विश्वजीत (सरसेनापती हंबीरराव), अक्षय जाधव (रौद्र), विजय गावंडे (सोयरीक), मंगेश धाकडे (वाळवी).

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : कैवल्यगान...(राहुल देशपांडे - मी वसंतराव), भेटला विठ्ठल माझा... (मनीष राजगिरे - धर्मवीर), चाल का बदललेली (अभय जोधपूरकर - मीडियम स्पायसी), हलका हलका चांदवा... (हृषिकेश रानडे - बोल हरी बोल)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : बाई गं... (आर्या आंबेकर - चंद्रमुखी), रंग लागला... (आनंदी जोशी - तमाशा लाईव्ह), सुख कळले... (श्रेया घोषाल - वेड), गेला सरला पाखरांचा थवा... (मुग्धा कऱ्हाडे - अनन्या), वाट माहेरची... (आरती अंकलीकर - गोदावरी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट संकलक : जयंत जठार (वाय), इम्रान महाडिक/ फैजल महाडिक (मी वसंतराव), आशीष म्हात्रे व अपूर्वा मोतीवले (३६ गुण), वैभव दाभाडे (झॉलिवूड), अभिजीत देशपांडे/ सौरभ प्रभुदेसाई (वाळवी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर : महेश लिमये (सरसेनापती हंबीरराव), अभिमन्यू डांगे (मी वसंतराव), मिलिंद जोग (पाँडिचेरी), केदार गायकवाड (धर्मवीर), शमिन कुलकर्णी (गोदावरी)

प्रीमियर सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक : मदन माने (सरसेनापती हंबीरराव), अशोक लोकरे/ ए. रुचा (मी वसंतराव), आशीष मेहता (मिडीयम स्पायसी), योगेश इंगळे (सोयरीक), मनोहर जाधव (फनरल).

प्रीमियर सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार : अमेय वाघ (अनन्या), भाऊ कदम (टाईमपास ३), प्रकाश भागवत (गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात),

प्रीमियर सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : अष्टमी... (उमेश जाधव- धर्मवीर), बाई गं... (आशीष पाटील- चंद्रमुखी), राजं आलं... (किरण बोरकर- पावनखिंड), चंद्रा... (दीपाली विचारे- चंद्रमुखी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com