स्वप्न पर स्क्वेअर फूट : - यशदा रियलटी

सकाळ रीडर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह
Saturday, 5 December 2020

आयुष्य नुसतच जगण्यात तेवढी मज्जा नाही जेवढी ती मनमुराद जगण्यात आहे. असं आयुष्य जगणाऱ्या लोकांची ही गोष्ट.

आयुष्य नुसतच जगण्यात तेवढी मज्जा नाही जेवढी ती मनमुराद जगण्यात आहे. असं आयुष्य जगणाऱ्या लोकांची ही गोष्ट. एक उत्तम जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या यशदा रियालटीचं स्प्लेंडीड पार्क आज लक्झरी तरीही अफफोरडेबल ह्या संकल्पनेवर आधारित आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या स्वप्नातलं घर मिळावं असं स्वप्न जो डेव्हलपर  बघतो त्याला यश चुकेल कसं? सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री ह्याने यशदा रियालटीच्या कुशल आर्किटेक्चर व दर्जेदार बांधकामाचा घेतलेला आढावा, उद्या प्रसारित होणाऱ्या स्वप्न पर स्क्वेअर फूट सीजन ३ च्या  भागात पहायला मिळेल.

ऊन सावलीचं कष्टाचं आयुष्य जगणाऱ्या, सामान्य माणसाच्या आयुष्याची क्वालिटी सुधारावी असं वाटणारा माणूस कोण असू शकतो? हा माणूस तोच असू शकतो जो या मातीतून आला आहे, मातीशी ज्याची नाळ जोडलेली आहे. आयुषाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती खालून वर येताना सातत्याने माणुसकीची साथ असलेली ही व्यक्ति म्हणजे यशदा रियालटी ग्रुपचेडिरेकटर वसंत काटे. 

दर्जेदार राहणीमानाच्या अमेनिटीस आणि अफफोर्डेबल लिविंग ही यशदा रियालटीची खासियत आहे. वसंत काटे आणि त्यांना साथ देणारा त्यांचा मित्र आणि कंपनी सी.ई.ओ. रोहिदास गवारे ह्यांच्या अथक परिश्रमामुळे आज असंख्य सर्व सामान्य लोकांना त्यांचं स्वप्नातलं घर मिळालं आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या वसंत काटे ह्यांची स्टोरी फार इंट्रेस्टिंग आहे आणि त्यांनी बनवलेल्या डुडुलगांव सेंट्रल, मोशी-आळंदी रोड, पुणे इथे बनलेल्या यशदा रियालटीच्या स्प्लेंडीड पार्कची गोष्ट त्याहून इंट्रेस्टिंग आहे.

माणुसकी जपण्याची कला फार कमी लोकांकडे असते आणि त्याचं उदाहरण म्हणजे गराड कुटुंबाला केली गेलेली मदत. एका अति सामान्य शेतकरी परिवाराला, त्यांचं घर घेण्याचं स्वप्न साकारण्यासाठी यशदा रियालटीचे वसंत काटे ह्यांनी कुठलाच विचार न करता असा विश्वास दाखवला की आज गराडकुटुंबाला आपलं हक्काचं घर घेता आलं. अश्या अनेक इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका. अद्भुत क्रिएटिव्ह्स निर्मित स्वप्न पर स्क्वेअर फूट सीजन ३, हा कार्यक्रम उद्या ६ डिसेंबर, रविवारी सकाळी ११:३० वाजता आणि बुधवारी दुपारी ३:३० वाजता साम टीव्हीवर प्रसारित होणार आहे. पहायला विसरू नका.

sakal readers connect initiative swapna per square feet yashada reality 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal readers connect initiative swapna per square feet yashada reality