Sharad Pawar_MVA
Sharad Pawar_MVA

Sakal Survey: पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला फटका? ६० टक्के लोक म्हणतात…

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद अचानक सोडल्यानं राज्यात राजकीय गोंधळ सुरु झाला आहे.

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद अचानक सोडल्यानं राज्यात राजकीय गोंधळ सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर सकाळ-साम टीव्हीनं सर्व्हे केला असून लोकांना याबद्दल काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, याबाबत लोकांनी खुलेपणानं आपलं मतप्रदर्शन केलं आहे. (Sakal Saam Survey What will happens to MVA due to Sharad Pawar Resigns from NCP Presidentship)

Sharad Pawar_MVA
Serbia gun fire: सर्बियातील शाळेत 14 वर्षांच्या मुलाकडून गोळीबार; 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ-साम टिव्हीच्या सर्व्हेनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयामुळं महाविकास आघाडीवर नक्कीच परिणाम होईल, असं ६०.७ टक्के लोकांना वाटतं आहे. म्हणजेच सॅम्पलमधील सर्वाधिक लोकांना पवारांच्या निर्णयाचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होतील असं वाटतं आहे.

Sharad Pawar_MVA
BJP Executive: भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर; भंडारी उपाध्यक्ष, मोहोळ सरचिटणीस

दरम्यान, पवारांच्या या निर्णयामुळं मविआवर परिणाम होईल की नाही, याबाबत २८.४ टक्के लोक संदिग्ध आहेत, त्यामुळं याबाबत काही सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर केवळ १०.९ टक्के लोकांना पवारांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयामुळं मविआवर काहीही परिणाम होणार नाही, असं वाटतं आहे.

Sharad Pawar_MVA
Wrestler Protest: "जर आम्ही लग्नाला बोलावलं नसतं तर..."; ब्रिजभूषण सिंहांसोबतच्या फोटोवर साक्षी मलिकनं सोडलं मौन

पण पवारांनी राष्ट्रवादीचं पद सोडणं आणि त्यामुळं मविआवर परिणाम होण्याबाबत संदिग्ध असलेल्यांची संख्या जवळपास ३० टक्के असल्यानं बऱ्याच जणांना शरद पवारांची ही नक्की खेळी काय आहे? हे कळेनासं झालं आहे किंवा शरद पवारांच्या बेरकीपणावर त्यांचा ठाम विश्वास असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनचं त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com