पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हा...! 

education
education

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत माहिती जाहीर झाली आहे. आता अधिक जोमाने अभ्यासाला लागले पाहिजे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्याचा आनंद निराळाच असतो. आपणही तो आनंद सहजतेने घेऊ शकता. यासाठी काय करावे लागेल, याचा घेतलेला आढावा... 

मित्रांनो, चला तयारी करण्याची वेळ आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने नुकतीच या वर्षात नेमक्‍या कोणत्या स्पर्धा परीक्षा, कधी व कोणत्या काळात होतील याची माहिती दिलेली आहे. तेव्हा पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचेय ना? तर मग कोणताच न्यूनगंड न बाळगता तयारीला लागा. "एमपीएससी'मार्फत घेतली जाणारी राज्यसेवेची परीक्षा महाराष्ट्रातून घेतली जाणारी सर्वांत महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारे खरेतर भाग्यवानच म्हटले पाहिजेत, अनेक विद्यार्थी अगदी पहिल्या प्रयत्नात ही परीक्षा यशस्वी होताना दिसतात. काही मुले पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत असतील, तर आपणही निश्‍चितपणे उत्तीर्ण होऊ शकतो. गरज आहे, फक्त योग्य प्रयत्नांची! पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी नेमकी कशाची गरज असते हे आपण समजावून घेऊ या. 

लहान मूल जेव्हा चालण्याचा सराव करते, तेव्हा ते सातत्याने धडपडताना दिसते. परंतु ज्या वेळी मोठ्या व्यक्तींचा हात धरून चालण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते लवकर चालण्यास शिकते. मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, की कमी काळात यशस्वी 
व्हायचे असेल, तर आपल्या विषयांसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्ती किंवा मार्गदर्शकाची गरज असते. 

मार्गदर्शकाचे महत्त्व अशासाठी, की मार्गदर्शक आपला वेळ वाचवीत असतो आणि आपल्याला यशस्वी मार्गाने नेण्याची दिशा दाखवितो. आपण स्वतः जेव्हा शिकण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा नक्कीच आपणास जास्त वेळ लागतो. जास्त वेळ लागण्याचे कारण म्हणजे आपली शिकण्याची "ट्रायल ऍण्ड एरर' अशी पद्धत असते. योग्य मार्गदर्शक आपल्या जोडीला असेल तर "ट्रायल आणि एरर'ची पद्धतच राहणार नाही. स्पर्धा परीक्षेतही असेच आहे. आपल्या विषयांची तयारी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली तर ती अधिक सुलभ व पक्की होईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केल्यामुळे आवश्‍यक असलेल्या वेळेत बचत होईल व अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. 

मित्रांनो, मग चला योग्य मार्गदर्शनाने तयारी करू या! 
योग्य मार्गदर्शन मोठ्या शहरांच्या ठिकाणी उपलब्ध होईल, मात्र घरापासून दूर राहावे लागेल, त्यासाठी खर्च करावा लागेल. खर्चच नव्हे तर वेळही जाणार आहे. मात्र, हेच मार्गदर्शन आपल्या घरी, आपण जिथे असू तिथे शिवनेरी फाउंडेशनने उपलब्ध करून दिले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी फाउंडेशनने तज्ज्ञांचे व्हिडिओ लेक्‍चर्स सर्व महाराष्ट्रात उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये सर्व विषय अगदी मुळापासून समजावून सांगितलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सर्व विषय समजावून घेता येतील. उदा. इतिहास या विषयाची तयारी करीत असाल, तर इतिहासातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक वर्गीकरणाच्या आधारे त्या-त्या टप्प्यातील महत्त्वाचे कालखंड, त्यांच्या राजवटी, तत्कालीन सामाजिक परिस्थिती व त्यांचे महत्त्व अशा पद्धतीने विषय समजावून सांगितलेले आहेत. त्यामुळे सर्व योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळत आहे. भूगोलामध्ये प्रश्‍नांच्या स्वरूपानुसार भूगोल विषय समजावून सांगण्यात आलेला आहे. यामध्ये सहावी ते बारावी पर्यंतच्या भूगोलावरील एनसीईआरटी पुस्तके, भूगोलातील मूलभूत संकल्पना, सिद्धांत, भूगोलातील विचारवंतांनी मांडलेल्या संकल्पना, त्यांचे विचार, सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल यांचा समावेश आहे.

भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये राज्यघटनेवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नपत्रिकांचे बारकाईने विश्‍लेषण करून ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, संसद, संघराज्य प्रणाली, महत्त्वाची पदे, महत्त्वाच्या संस्था व महत्त्वाचे आयोग अशा राज्यघटनेतील विविध तरतुदी, याखेरीज महत्त्वाच्या घटनादुरुस्तीची विधेयके, संसदेने अलीकडे मांडलेली नवी विधेयके, कायदे यांचाही समावेश अगदी सखोल पद्धतीने केलेला आहे. आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शासकीय धोरणे व कार्यक्रम यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सामान्य विज्ञान घटकांत सातवी ते दहावीची "एनसीईआरटी'ची पुस्तके पायाभूत मानून या विषयांची रचना करण्यात आलेली आहे. पर्यावरणीय मुद्द्यांची रचना करताना पर्यावरण, त्यातील घटक त्यांचे स्वरूप, वैशिष्ट्ये, तसेच संबंधित जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सी-सॅट या घटकावरील निर्णय निर्धारण व समस्या निवारण, बुद्धिमापन, तार्किक युक्तिवाद, विश्‍लेषणक्षमता व सामग्री विश्‍लेषण, अंकगणित या विषयांची पेपर- 2 च्या स्वरूपात सविस्तर तयारी करून घेण्यात आलेली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सद्य घटनांची वेळोवेळी माहिती मिळावी यासाठी पुढील दीड वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सऍप व ई-मेलवर सातत्याने माहिती पाठविली जाणार आहेत. त्यामुळे सद्य घटनांबाबत अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन उमेदवारांना त्यांच्या घरी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, संधीची वाट पाहत बसाल, तर यशस्वी होण्यासाठीच्या कालावधीत वाढ होत जाईल. यशस्वी होण्यासाठी चित्त्यासारखी झेप घेऊन संधी पकडावी लागेल. यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज लागेल. ती गरज सकाळ विद्या व शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून भरून निघेल. तेव्हा तोपर्यंत प्रतीक्षा करीत राहू नका. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी हे तंत्र स्वीकारले आहे, आपणही त्वरा करा. 

जिद्दीने अधिकारीपदाचे स्वप्न पूर्ण...! 
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत युवकाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने अभ्यास करून ग्रामीण भागातील विद्यार्थी होतकरू असतात, हे सिद्ध केले. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रावीण्य मिळवून सरकारी नोकरीत सहायक कर आयुक्त झाला. सध्या तो बंगळूर येथे आयकर विभागात कार्यरत आहे. योगेश प्रभाकर मेहरे (रा. वर्धमनेरी, ता. आर्वी) असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव. त्याचे वडील शेती करतात. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून, उदरनिर्वाह होत नसल्याने ते रोजंदारीवर कामाला जात असत. मेहरे याचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या, तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्धमनेरीच्या सद्‌गुरू विद्यामंदिरात झाले. आर्वी येथील तंत्रनिकेतनमध्ये पदविका घेऊन पुणे येथील विद्याभारती अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल विषयात बी.ई.ची पदवी घेतली. सोबतच एमपीएससी व स्पर्धा परीक्षा दिली. बंगळूर येथील हिंदुस्तान लिव्हर कंपनीत वैज्ञानिकाची नोकरी सुरू केली. 

मात्र, समाज सेवा करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने योगेशने ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. आई-वडिलांना आपला मुलगा जे करेल, ते योग्यच करेल असा ठाम विश्‍वास असल्याने एवढी मोठी नोकरी का सोडली, असा प्रश्‍न न करता तू जे करशील ते योग्यच करशील, असे त्यांनी सांगितल्याने त्याला बळ मिळाले. त्यातच त्याची पत्नी दियाकुमारी हिची साथ मोलाची ठरली. पडत्या काळात अनेक खस्ता खाऊन जिद्दीने त्याने "यूपीएससी'चा अभ्यास सुरू केला. या परीक्षेत 2013 मध्ये 534 वी रॅंक मिळाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. परिश्रमाचे चीज झाले. अल्पभूधारक शेतकऱ्याचा, रोजंदारीवर कामाला जाणाऱ्याचा मुलगा सहायक कर आयुक्त झाला.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com