
साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरणी मोहन चौहान दोषी; दिंडोशी कोर्टाचा निकाल
मुंबई : मुंबईच्या साकीनाका येथील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरपोला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Session Court) दोषी ठरवले असून, आरोपी मोहन चौहान याच्या विरोधात 1 जूनपासून शिक्षेवर युक्तीवीद सुरु करण्यात येणार आहे. (Sakinaka Rape Murder Case)
हेही वाचा: सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्याने एकेकाळी सलमानला देखील मारण्याची धमकी दिली होती
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये साकीनाका परिसरात हे भयानक हत्याकांड घडले होते. यामध्ये आरोपीने एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. तपासादरम्यान, आरोपीने पीडितेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली होती. घटनेनंतर संबंधित महिलेला मृतदेह एका टेम्पोमध्ये आढळून आला होता. तसेच या प्रकरणाचे सीसीटिव्ही फुटेजदेखील समोर आले होते.
हेही वाचा: डिप्रेशननी घेतला मॉडेलचा जीव, बंगाली इंडस्ट्रीत १५ दिवसांतील चौथी Suicide
गेल्यावर्षी 10 सप्टेंबर रोजी साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर मोहन चौहानने बलात्कार (Rape) करत तिची हत्या (Murder) केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी विविध कलमांतंगर्त गुन्हे दाखल केले होते. घटनेनंतर पीडित महिलेचा मृतदेह एका टेम्पोमध्ये आढळून आला होता. या हत्याकांडानंतर याची गंभीर दखल राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर आज संबंधित आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून, 1 जूनपासून चौहानला नेमकी कशा प्रकारची शिक्षा द्यायची यावर सुनावणी सुरु होणार आहे. त्यामुळे आरोपी मोहन चौहानला नेमकी काय शिक्षा मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Sakinaka Rape Murder Case Dindoshi Session Court Important Result On Same
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..