Sambhaji Bhide : टिकलीचा आग्रह सोडला; खाकी वर्दीसमोर नरमले?

टिकली लावल्यानंतर बोलेन असं संभाजी भिडेंनी एका महिला पत्रकाराला सुनावलं होतं.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSakal
Updated on

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. टिकली लाव तरच तुझ्याशी बोलेन, असं महिला पत्रकाराला त्यांनी सुनावलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. पण आता त्यांनी आपल्या त्या भूमिकेवरुन यु-टर्न घेतल्याचं दिसून आलं.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Controversy : महिलांना टिकली लावायला सांगणारे तुम्ही कोण?, पुणेकर महिलांचा संताप

कशावरुन वाद झाला होता?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे मुंबईला गेले होते. त्या भेटीनंतर साम टीव्हीच्या महिला प्रतिनिधीने त्यांना प्रश्न विचारला. त्यावरुन तू टिकली किंवा कुंकू लावून ये मग तुझ्याशी बोलेन, असं ते म्हणाले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महिला आयोगाने त्यांना दोनदा नोटीसही पाठवली आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : आधी टिकली लाव, मगच मी बोलेन! संभाजी भिडे हे काय बडबडले?

पुन्हा कशावरुन चर्चेत आले?

टिपू सुलतान जयंती साजरी करणे बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी भिडे यांनी पोलिसांकडे निवेदन सादर केले. यावेळी त्यांचा महिला पोलीस अधिकाऱ्याला निवेदन देतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या महिला अधिकाऱ्यांशी आदराने भेट घेत त्यांनी आपलं निवेदन सादर केलं होतं. यावेळचा अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले यांच्यासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे आता भिडे गुरुजींनी यु-टर्न घेतल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Paper Leak
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Marathi News Esakal
www.esakal.com