तानाजी चित्रपटातील दृष्यावरून वाद उफाळला; संभाजी ब्रिगेडचा विरोध (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित "तानाजी : द अनसंग वॉरीयर' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही वादग्रस्त चित्रण केले आहे. ते चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी केली संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील याच सीनवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे...

 

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

आज (ता.19) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांच्यावर काही तरी फेकल्याचे दाखविण्यात आले आहे. यातून चुकीचा संदेश जात असल्याने वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा प्रसंग चित्रपटातून वगळावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत : खा. डॉ. अमोल कोल्हे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade Opposed scene in Taanaji Movie trailer