महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत : खा. डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत : खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी 

नवी दिल्ली : "बैलगाडा शर्यतीचा" मुद्दा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता. १९) शून्य प्रहरात उचललला. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी लावून धरली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ असून शेतकरी मुलांप्रमाणे बैलांवर प्रेम करतात. देशी गाईंचा वंश टिकवून ठेवण्यासाठी बैलगाडा शर्यत सुरू होणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील अर्थकारणही त्यावर अवलंबून असते. असा मुद्दा डॉ. कोल्हे यांनी सभागृहात लावून धरला.

आघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून सात नेते राहणार उपस्थित

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रश्न म्हणून विशेष लक्ष घालण्याचीही त्यांनी यावेळी विनंती केली. मंत्री जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील आठवड्यात आवश्यक ती माहिती घेऊन या संदर्भात पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Dr. amol kolhe speak in Loksabha about Bullock races