...हे गुजरातमध्ये होऊ शकतं, मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

संभाजीराजे यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या स्मारकास भेट दिली आहे.

'...हे गुजरातमध्ये होऊ शकतं, मग महाराष्ट्रात का नाही?'

राजकीय वर्तुळात काही ना काही कारणानं नेहमीच एकमेकांवर टीकाटिपण्णी होत असते. अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर निशाणा साधला जातो. आता आणखी एका मुद्द्यांवरून खासदार संभाजीराजे यांनी राज्यसरकारला सवाल केला आहे. संभाजीराजे यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या स्मारकास भेट दिली आहे. यावरून त्यांनी हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही ? असा सवालही उपस्थित केला आहे.

हेही वाचा: आघाडीच्या माजी मंत्र्याला राष्ट्रवादीच्या बंडखोरांचे आव्हान

त्यांनी ट्विटद्वारे राज्यसरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणातात, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या स्मारकास भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरच सरदार पटेल यांचं कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. हे स्मारक साकारण्यासाठी गुजरात सरकारने मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, हे इथे आल्यावर जाणवते. इतके भव्य दिव्य स्मारक गुजरात सरकारने केवळ पाच वर्षांत बांधून पूर्ण केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आणखी कोणत्या वादाला तोंड फुटणार? यावर चर्चा सुरु आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा: 'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

loading image
go to top