आघाडीच्या माजी मंत्र्याला राष्ट्रवादीच्या बंडखोरांचे आव्हान; आता लक्ष खासदार गटाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

राष्ट्रवादीच्या एका गटाने घोरपडेंना विरोध करीत पाटील यांची उमेदवारी पुढे आणली आहे.

आघाडीच्या माजी मंत्र्याला राष्ट्रवादीच्या बंडखोरांचे आव्हान

sakal_logo
By
शमु मुल्ला

शिरढोण : जिल्हा बँकेच्या रिंगणात माजी मंत्री अजितराव घोरपडे पुन्हा एकदा उतरले आहेत. त्यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी विठ्ठल पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीने कवठेमहांकाळ तालुक्यातून अनिता सगरे यांना महिला गटातून तर भाजप आघाडीने अनुसुचित जाती गटातून बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश साबळे यांना उमेदवारी दिली आहे. पुर्वपरंपरेप्रमाणे आमदार, खासदार,मंत्री त्यांच्या नातेवाईकांनाच या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलमध्ये संधी मिळत आली आहे.

या निवडणुकीतून खासदार संजय पाटील यांनी अचानक माघार घेतल्याने त्यांच्या गटाची तालुक्यातील मते कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता होती. खासदार समर्थक आणि विद्यमान संचालक चंद्रकांत हाक्के यांनी कवठेमहांकाळ येथील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या जाहीर सभेत उपस्थिती लावली. तर आर.आर यांचे बंधू सुरेश पाटील यांनी आघाडी धर्म पाळू अशी ग्वाही दिल्याने घोरपडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री घोरपडेंना सोसायटी गटातून त्यांचे एककाळचे सहकारी विठ्ठल पाटील यांनी आव्हान दिला आहे. ते घोरपडेंचे विकास आघाडीपासूनचे सहकारी आरआर यांनी त्यांना राष्ट्रवादीत नेले. यावेळी राष्ट्रवादीच्या एका गटाने घोरपडेंना विरोध करीत पाटील यांची उमेदवारी पुढे आणली आहे.

हेही वाचा: विधानपरिषद रणधुमाळी : पाटील-महाडिकांचा लागणार कस

पाटील यांनी यापुर्वीही सन २००० मध्ये बँकेच्या निवडणकीत घोरपडे यांना आव्हान दिले होते. खरशिंग ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, वसंतदादा कारखान्याचे संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजप पुरस्कृत म्हणून ते शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार आहेत. इथे राष्ट्रवादीतील अनेक मात्तबर नाराजांवरच त्यांची भिस्त आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले यांच्यासह स्थानिक नेते आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित होते. विठ्ठल पाटील यांना मात्र काँग्रेसमधील जुन्या स्नेहसंबंधामुळे आशावादी आहेत.

यावेळी महिला गटातून श्रीमती अनिता सगरे यांना संधी मिळाली आहे. त्या दिवंगत नेते नानासाहेब सगरे यांच्या स्नुषा आहेत. त्या विजयी झाल्यास सगरे घराण्यातील या तिसऱ्या संचालक असतील. अनुसूचित जाती गटातून रमेश साबळे यांच्या विरोधात विद्यमान संचालक बाळासाहेब होनमोरे यांना आघाडीने पुन्हा संधी दिली आहे.

हेही वाचा: 29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

मतदार संख्या

एकूण मतदार- १५९

  • अ वर्ग - ६८

  • क वर्ग -१- २१

  • क-२ चे - ०६

  • क-३ चे - ३४

  • आणि क-४ - ३०

loading image
go to top