महाराष्ट्रातील आमदारांना संभाजीराजेंचे खुलं पत्र; म्हणाले...

Sambhaji Raje
Sambhaji Raje Esakal

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संभाजीराजे ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच पाठिंबा दिला आहे. अशात संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र (letter) लिहिले आहे. पत्रातून निवडणुकीत विजयी होण्यासाठी अपना सर्वांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रातून म्हटले आहे. (Sambhaji Rajes open letter to MLAs in Maharashtra)

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी द्यावी, असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे, असे संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) पत्रात म्हटले आहे.

२००७ पासून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याची भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले, असेही संभाजीराजेंनी पत्रात (letter) म्हटले आहे.

Sambhaji Raje
...अन् पोलिसांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी पार पडला अपूर्ण विवाह

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र, हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदारकीच्या कारकिर्दीत लक्षात आले. याचमुळे राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. यासाठी मला अपना सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, असेही संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com