संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम! ५ जूनपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...

घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच, शिवरायांवर विचारमंथन करण्याचं आवाहन
sambhaji raje
sambhaji raje
Summary

घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच, शिवरायांवर विचारमंथन करण्याचं आवाहन

पुणे : मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारनं अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण सरकारनं समाजाला गृहित धरु नये. येत्या ५ जूनपर्यंत सरकारनं आमच्या मागण्यांवर निर्णय घेतला पाहिजे, अन्यथा रायगडावरील राजसदरवरुन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असा अल्टिमेटम खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Sambhaji Rajes ultimatum to the govt Decide on demands by June 5)

sambhaji raje
विधानसभा निवडणुकांमध्ये EVM, VVPATची मोजणी १०० टक्के जुळली - EC

संभाजीराजे म्हणाले, "परवा झालेल्या पत्रकार परिषदेत मी सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं की, मराठा समाजावर अन्याय होत असून आम्ही मांडलेल्या पाच गोष्टींवर जर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही रायगडावरील राजसदरवरुन पुढची भूमिका मांडू. माझ्या या भूमिकेनंतर अनेक शिवभक्तांना असं वाटलं की, शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर महाराजांना वंदन करण्यासाठी गेल्यानंतर याबाबत भूमिका मांडली जाईल. त्यासाठी शिवभक्तांनी 'चलो रायगड' अशी मोहिम सुरु केली. पण जर शिवभक्तांना रायगडावर आणलं आणि कोरोनाचं संकट आणखी वाढलं तर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला असता. कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. अनेकांचा यामध्ये बळी गेलाय. त्यामुळे अशा अडचणीत शिवभक्तांना टाकणं मला शोभत नाही, त्यामुळं मी अपेक्षा व्यक्त करतो की आपण मागच्या वर्षी माझं ऐकलं तसंच यावर्षीही ऐकालं"

घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करा, शिवरायांवर विचारमंथन करा

मी तुमच्या भावनांची कदर करतो पण आज ही वेळ नाही. आपल्या घरी आपले आई-वडील, भावंड, मुलं आहेत. त्यामुळे त्यांची काळजी आपल्याला करायची आहे. आपल्या जीवाशी खेळ करायची ही वेळ नाहीए. मी शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो की, यावेळी आपण माझं ऐकावं. आपण या वर्षी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा. हे करताना आपण आत्मचिंतन करुयात, शिवाजी महाराजांबद्दल विचारमंथन करुयात. मी तुमच्यावतीनं परंपरा खंडीत न होण्यासाठी रायगडावर जाईन. पण 'चलो रायगड' ही मोहिम ज्यासाठी निर्माण झाली हे मी विसरलेलो नाही. मे महिन्यात आपण सरकारकडे मागण्या केल्या होत्या. सरकारनं अजूनही या पाच मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांनी मला फोन केले, पण मागण्या अद्याप मागण्या झालेल्या नाहीत," असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.

७ जूनला राज्याभिषेकदिनी समाजाच्यावतीनं मांडणार भूमिका

मी २८ मे ला बोललो होतो जर पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची भूमिका रायगडावरील राजसदरवरुनच जाहीर होईल. त्यामुळे मी आजही ठामपणे सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला कुणीही गृहित धरु नका. पाच जूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमची भूमिका ठरली आहे त्या प्रमाणेच राहिलं. सकल मराठा समाजानं ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मान्य कशा होतील त्याकडे मी पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. परत एकदा मी सरकारला सांगतो तुम्ही जर निर्णय घेतला नाहीत तर ७ जून ला राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून राजसदरावरुन समाजाच्या भावना आम्ही मांडू. मी लाखो लोकांचा आवाज घेऊन राजसदरवरुन बोलणार आहे. रायगड परिसरातही कोणाला कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुंभमेळ्यात जी चूक झाली, मेट्रोच्या उद्घाटनावेळी राजकीय नेत्यांनी जी चूक केली ती आपल्याला करायची नाही, असं आवाहनही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com