Tanaji Sawant : 'राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा मतदारसंघ आजारी', माजी खासदाराने केली पोलखोल

रुग्णालयांची परिस्थिति पाहून संभाजीराजे संतापले
Tanaji Sawant
Tanaji SawantEsakal

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वकतव्यांमुळे चर्चेत असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं कामात लक्ष नसल्याचं दिसुन आलं आहे. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेची पाहणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्याच आरोग्य यंत्रणेची परिस्थिति पाहून संभाजीराजे छत्रपती संतापल्याचे दिसून आले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली. खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालयांची दुरावस्था झाल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

Tanaji Sawant
Maharashtra Politics : ठाकरे गटाला अपेक्षा आक्रमकतेची! सभेत धारदार वागण्यासंबंधी मविआशी चर्चा

संभाजीराजे छत्रपती स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असताना संभाजीराजेंनी काल (मंगळवारी) तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम शहरातील शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाची झालेली दुरावस्था पाहून संभाजीराजे संतापले.

Tanaji Sawant
Rupali Chakankar : अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींचे प्रमाण घटले; रूपाली चाकणकर

भूम शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांची आणि नर्सची कमतरता आहे. रुग्णालयात अस्वच्छता असून रुग्णालयातील अनेक वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याचे पाहून संभाजीराजे छत्रपती चांगलेच भडकले. भूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाही अशाच प्रकारची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान रुग्णालयातील पाहणीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला फैलावरच घेतले. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, आम्ही काहीही सहन करु. पण आरोग्य विभाग आणि प्राथमिक केंद्राची दुरावस्था सहन करुन घोणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आरोग्याचे विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा मी बघून घेईन, असा इशाराही संभाजीराजे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com