संभाजीराजे छत्रपतींच्या गाडीचं सारथ्य केलं शिवसेना खासदाराच्या सुनेनं I Sambhaji Chhatrapati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

संभाजीराजेंच्या गाडीचं सारथ्य केलं शिवसेना खासदाराच्या सुनेनं

सोशल मीडियावर अगदी काही क्षणात व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांचा चारचाकी गाडीतील प्रवासाचा. गाडीचं सारथ्य एक महिला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नाशिकमधील ही महिला नेमकी कोण आहे, या चर्चेला आता उधाण आलं आहे.

दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार संभाजीराजे हे नाशकमध्ये दाखल झाले होते. नाशिकरोडहून ते देवळाळी कॅम्पच्या (Nashik Road to Devlali Camp) परिसरात जात असताना त्यांच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केलं आहे. यावेळी संभाजीराजे हे पुढेच बसले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी संभाजीराजेंचे फोटो काढण्यासाठी आजूबाजूला गर्दी झाली होती. त्यामुळे गाडी चालवणारी ती महिला नेमकी कोण होती असा प्रश्न अनेकांना पडला.

हेही वाचा: राणेंच्या पायगुणावरून शिवसेना आमदाराचा पंतप्रधानांना सल्ला

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 18 फेब्रुवारीला सांयकाळी नाशिकमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. खासदार संभाजी राजे हे खासदार हेमंत गोडसे यांच्या घरी भेट द्यायला जाणार होते. त्यावेळी त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी हेमंत गोडसे यांनी एक गाडी संभाजी राजेंना रिसीव्ह करण्यासाठी पाठवली होती. स्वतः हेमंत गोडसे हे दिल्लीत असल्यामुळे त्यांना संभाजी राजेंना आणायला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी आपल्या सूनेवर टाकली. हेमंत गोडसे यांनी सून भक्ती गोडसे या गाडी घेऊन संभाजीराजे भोसले यांना घेण्यासाठी गेल्या होत्या.

हेमंत गोडसे यांची सून आपल्याला रीसिव्ह करायला आली आहे, हे पाहून संभाजी राजेंनाही नवल वाटलं. यावेळी हेमंत गोडसे यांची सून भक्ती गोडसे यांनी मी तुमची गाडी चालवू का, असा प्रश्न असता संभाजीराजेंनीही परवानगी देत आपल्या गाडीचं सारथ्य भक्ती गोडसे यांना करायला दिलं. नेहमीपेक्षा काहीसं वेगळं चित्र दिसल्यानं हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी लगबग सुरु होती. यावेळी संभाजीराजे यांनी त्याच्या ड्रायव्हिंगचं कौतुकही केले. नाशिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उत्सव सोहळ्याला भेट देण्यासाठी आले असता हा किस्सा घडला आहे.

हेही वाचा: वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; मद्य विक्री परवाना प्रकरण भोवणार?

Web Title: Sambhajiraje Chhatrapati Video Viral With Driving By Hemant Godse Daughter In Law In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top