
मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं !
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (C M Uddhav Thackeray) यांच्याकडे मराठा आरक्षणा संदर्भातील पाच मागण्या दिल्या असून, त्यांच्या भेटीचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांनी घेतला आहे. आज नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात सकल मराठा समाजातर्फे आज मूक आंदोलन झाले. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री ठाकरे संभाजीराजे यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असून, संभाजीराजे यांनी त्यांची भेट घ्यावी, असे आवाहन केले. (sambhajiraje-chhatrapati-warns-government-maharashtra-maratha-reservation-silent-agitation-kolhapur)
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांची उदयाच भेट घेऊन चर्चा करावी; सतेज पाटीलांचे संभाजीराजेंनी आवाहन
त्यावर संभाजीराजे म्हणाले, "राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात काय करावे, याकरिता पाच मागण्या दिलेल्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता सरकारने लवकर करावी. मराठा आरक्षणात कोण चुकीचे कोण बरोबर यावर फारसे भाष्य न करता मराठा आरक्षणासाठी नेमकेपणाने काय करणे गरजेचे आहे हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी."ते म्हणाले "शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास पुणे ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च अटळ आहे. त्याची तयारी राज्यातील समन्वयकांबरोबर बैठक घेऊन करणार आहोत."