
मुख्यमंत्र्यांची उद्याच भेट घेऊन चर्चा करावी; संभाजीराजेंना आवाहन
कोल्हापूर: खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati)यांनी मांडलेल्या मागण्यां संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून, संभाजीराजे यांनी उद्या (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांची भेट घेऊन चर्चा करावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील(satej patil) यांनी आज येथे केले. सकल मराठा समाजातर्फे नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक परिसरात आयोजित मूक आंदोलनात ते बोलत होते. (satej-patil-appeal-for-sambhaji-raje-meet-the-chief-minister-silent-agitation-kolhapur-news)
पालकमंत्री पाटील म्हणाले, "संभाजीराजे यांची मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांच्या पाठिशी राज्य शासनाचा घटक म्हणून भक्कमपणे उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. राज्य शासनही मराठा आरक्षणाच्याभूमिकेबाबत सकारात्मक आहे. हा प्रश्न संयमाने सुटावा, याची नैतिक जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी वकिलांची टीम बदलली नाही.
हेही वाचा-मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा; श्रीमंत शाहू महाराज
ते म्हणाले, "केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाची जबाबदारी संभाजीराजेंकडे आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आवश्यक ती तरतूद केली जाईल. कोपर्डीच्या निर्भयाला फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून न्याय दिला जाईल. सरकारमधला एक जबाबदार मंत्री म्हणून मी, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांशी संभाजी राजे यांची भेट घडवून आणणे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री संभाजीराजे यांची भेट घ्यायला तयार आहेत. आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. त्याकरिता हातात हात घालून पुढे जाण्याची आवश्यकता आहे."