Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Accident
Accident esakal

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.

समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे.

डॉक्टर ज्योती क्षीरसागर,डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर अशी मृतकाची नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com