

Samruddhi Accident
esakal
वर्धा: समृद्धी महामार्गावर विरूळ लगत झालेल्या अपघातात सालोड येथील राजेश टिपले यांच्या अख्ख्या कुटुंबावर काळाने घाला घातला. मुलीला शिक्षणाकरिता सोडण्याकरिता गेलेले आई-वडील आणि थोरली बहीण जान्हवी यांनी तन्वीला कायमचेच सोडून गेल्याची व्यथा सालोड (हिरापूर) येथील नागरिक साश्रू नयनांनी सांगतात. तर त्यांच्या सोबत असलेल्या अंकुश राऊत याचे कुटुंबही उघड्यावर आले आहे.