Eknath Shinde सरकारकडून सत्तेचा गैरवापर; शिंदे गटाच्या नेत्याने मान्य केली चूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde सरकारकडून सत्तेचा गैरवापर; शिंदे गटाच्या नेत्याने मान्य केली चूक

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाड्यांसाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. मात्र यामुळे सुरू झालेल्या वादानंतर खोतकर यांनी चूक मान्य केली. (Dasara Melava news in Marathi)

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्ध महामार्ग खुला!

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्यानं आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.

सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघाल्या आहेत. अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला आहे. तो याच महामार्गवरुन रवाना झाला. म्हणजे जालना ते वैजापूरपर्यंत हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. जालना ते वैजापूर १०० किमी अंतर आहे, पण हा मार्ग खास राजकारण्यांसाठी खुला करण्यात आला असल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा: Dasara Melava : बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखाहून अधिक लोक जमतील - दीपक केसरकर

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचा दसरा मेळावा असून या मेळाव्यासाठी मार्ग उद्घाटनापूर्वीच खुला केल्याने सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या संदर्भात खोतकर यांच्याशी संवाद साधला असता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं खोतकर यांनी म्हटलं. तसेच उद्घघाटनापूर्वी गाड्या समृद्धी महामार्गावरून नेण्याची आपली चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.