Dasara Melava : बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखाहून अधिक लोक जमतील - दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shinde Group Dasara Melava
Dasara Melava : बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखाहून अधिक लोक जमतील - दीपक केसरकर

Dasara Melava : बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखाहून अधिक लोक जमतील - दीपक केसरकर

दसरा मेळाव्यासाठी आता शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अखेर शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच पक्षाचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. ठाकरेंचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होईल तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांचा मेळावा बीकेसीतल्या मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला तीन लाखाहून जास्त लोक येतील, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Dasara Melava : एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत! एकनाथ शिंदे जिंदाबाद - अमृता फडणवीस

दसरा मेळाव्याच्या यशाबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. हायकोर्टाच्या निर्देशांचं पालन करण्यासाठी पोलीस तत्पर असतील. बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखांपेक्षा जास्त लोक येतील. बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडतील. असंख्य नागरिक शिंदेंच्या स्वागतासाठी असतील.

हेही वाचा: Dasara Melava : "दोन्ही गट समोरासमोर आले तर..."; विश्वास नांगरे पाटलांची माहिती

दसरा मेळाव्याच्या आयोजनाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, "दसरा मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. सर्वांनी लवकर सभास्थानी पोहोचणं गरजेचं आहे. पार्किंगला गाड्या लावून ५-१० मिनिटं चालत सभास्थानी पोहोचता येईल. बीकेसीतला मेळावा अतिभव्य होणार आहे. राज्यातली जनता आशेने मुख्यमंत्री शिंदेकडे पाहतेय."