मनसे मुंबईसाठी खंबीर, राऊतांनी फक्त..; संदीप देशपांडेंची टीका

'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापातही नाही'
political
politicalesakal
Summary

'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापातही नाही'

दोन दिवसांपूर्वी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं प्रेझेंटेशन भाजपनं तयार केलं असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी केला होता. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले होते. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

political
सदावर्तेंना पुन्हा कोठडी की जामीन? आज निर्णय

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजप (BJP) कट रचतंय या खासदार राऊत यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रतित्त्युर दिलं आहे. यात देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणतात, विचार, भ्रमकार, सामनावीर यांनी जो हिशोब 'इ. डी'ला (ED) द्यायचा आहे, त्याची चिंता करावी. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापातही नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत.

काय म्हणालेत खासदार राऊत

किरीट सोमय्या दोन कारणांसाठी दिल्लीत जातात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जातात, दुसरे म्हणजे मुंबई केंद्रशासीत प्रदेश करण्यासंदर्भात त्यांचे कारस्थान सुरु आहे. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने सोमय्या हे नेतृत्व करत आहेत. मुंबई कशी केंद्रशासीत करता येईल याचे प्रेझिंटेशन त्यांनी तयार केले आहे. त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिले आहे. या कटात मुंबईतील काही धनिक, भाजपचे काही लोक यांच्या संगनमताने सोमय्या नेतृत्व करत आहेत. काही करुन त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

political
PM पदाची शपथ घेण्याआधी काश्मीर प्रश्नावर शरीफ यांचं वक्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com