PM पदाची शपथ घेण्याआधी काश्मीर प्रश्नावर शरीफ यांचं वक्तव्य

पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच शरीफ यांनी भारत-पाक संबंध आणि काश्मीर प्रश्नावर भाष्य केलं
Shahbaz Sharif
Shahbaz Sharifgoogle

पाकिस्तानातील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पंतप्रधान इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलं आहे. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` खालसा झाली आहे. दरम्यान, आता शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif Pakistan) यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज केला आहे. सध्याच्या स्थितीत बहुमताचा आकडा विरोधकांच्या बाजूने असल्याने शाहबाज शरीफ हेच पंतप्रधानपदी विराजमान होतील, असं सांगितलं जात आहे. आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच शरीफ यांनी भारत-पाक संबंध आणि काश्मीर प्रश्नावर भाष्य केलं आहे.

शाहबाज शरीफ म्हणाले, 'भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मात्र जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत हे शक्य नाही,' असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रीय सद्भावना आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवं सरकार प्रयत्नशील असेल, असंही शरीफ म्हणाले आहेत. त्यामुळे शरीफ यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा पाकिस्तनाच्या राजकीय वातवरणात बदलांचे वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Shahbaz Sharif
PM पदावरुन हकालपट्टीनंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

दरम्यान, इम्रान खान यांनी ट्वीट करून आव्हान दिलं आहे. यात ते म्हणालेत, विरोधी पक्षाच्या अचूक रणनीतीमुळे पंतप्रधानपदाची खुर्ची गमावलेल्या इम्रान खान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'पाकिस्तानला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं होतं. मात्र परकीय शक्तींच्या कारस्थानाविरुद्ध आजपासून पुन्हा नवं स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं आहे. पाकिस्तानची जनता इथल्या लोकशाहीचं संरक्षण करत आहे आणि यापुढेही करत राहील,' असं ट्वीट इम्रान खान यांनी केलं आहे.

अविश्वास प्रस्ताव मंजूर करून इम्रान खान यांचं सरकार उलथून टाकल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या वतीने शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif Pakistan) यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (PTI) या पक्षाकडून शाह महमूद कुरैशी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत. सध्याच्या स्थितीत बहुमताचा आकडा विरोधकांच्या बाजूने असल्याने शाहबाज शरीफ हेच पंतप्रधानपदी विराजमान होतील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून सत्तांतराबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Shahbaz Sharif
आधी भावासाठी जेलमध्ये... आणि आता थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर दावा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com