
रोहित पाटलांचा भाजपला 'दे धक्का'; खासदार संजयकाकांच्या पॅनलचं डिपॉझिट जप्त
तासगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर.आर. पाटील हे राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले असून त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. रोहित पाटील यांनी दिग्गज नेते आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उवडत किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज केली. याआधी रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीतही विरोधकांना धुळ चारली होती. (Rohit RR Patil News in Marathi)
हेही वाचा: "हा तर रामभक्तांचा अपमान"; काँग्रेसच्या आंदोलनावर भडकले योगी आदित्यनाथ
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पाटील यांना बळ दिलं जात आहे. तर आर.आर. पाटलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न रोहिती पाटील करत आहेत. रोहित यांची प्रचार करण्याची पद्धत ग्रामीण मतदारांना साद घालत असून त्यामुळे त्यांना यशही मिळताना दिसत आहे.
हेही वाचा: मंत्रीमंडळ विस्तार केला असता तर CM आजारीच पडले नसते; अजित पवारांची टोलेबाजी
सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज पार पडली. निवडणुकीत ३ प्रभागांमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र रोहित पाटील यांनी गावकऱ्यांना साद घातल ग्रामपंचायतीत विजय मिळवला. या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्या पॅनलमधील सदस्यांचं डिपॉझिट जप्त झालं.
Web Title: Sangali R R Patil Son Rohit Patil Win Kidarwadi Grampanchayat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..