esakal | जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या बँकेवर चौकशीचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

सध्या या बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांची या बँकेवर सध्या सत्ता आहे.

जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या बँकेवर चौकशीचे आदेश

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत. विभागीय सहनिबंधकांनी तात्काळ या प्रकरणी कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे. या बँकेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सत्ता असून त्यांच्याच पक्षाचे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी लावण्यात आली आहे.

चिखली (ता. शिराळा) येथील मानसिंग फ. नाईक विकास सहकारी संस्थेने विभागीय आयुक्तांकडे बँकेच्या चौकशीची मागणी केली होती. त्यात बँकेमधील इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखांतील फर्निचर खरेदी, एटीम मशीन खरेदी, नोटा मोजण्याचे मशीन खरेदी आदी बाबींवर गरज नसताना ३० ते ४० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी तक्रार होती. शिवाय, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी, महिला बचत गट यांचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखन, बँख संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटीचे कर्ज कार्यालयाची शिफारस नसताना देणे, टेंडर न काढता ७२ कोटी ६८ लाख रुपयांचे फर्निचर खरेदी करणे, शाखा नूतनीकरण, विकास संस्था संगणकीकरणासाठी ११ कोटी खर्च, महांकाली कारखान्याकडील कर्ज वसूल न करणे, स्वप्नपुर्ती शुगर्स कारखान्याला चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्ज देणे, २१ तांत्रिक पदे बोगस कागदपत्रांच्या आधारे भरणे आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या दोन्ही तक्रारींच्या आधारे ही चौकशी लावण्यात आली आहे.

हेही वाचा: समरजित घाटगेंचा पैरा लवकरच फेडू; हसन मुश्रीफांचा इशारा

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ अन्वये संबंधित मुद्यांवर चाचणी लेखापरीक्षणाची किंवा कलम ८३ मधील तरतुदीनुसार सखोल चौकशीची कार्यवाही करावी, असे आदेश कवडे यांनी दिले आहेत. सध्या या बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांची या बँकेवर सध्या सत्ता आहे. त्यांचे विश्‍वासू जुने सहकारी दिलीप पाटील गेली सहा वर्षे अध्यक्ष आहेत.

loading image
go to top